-
नाते टिकवून ठेवण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात, मात्र कधीकधी प्रयत्न केले तरी नाते तुटतेच. मात्र, चूक कळल्यावर लोक जुन्या नात्याला पुन्हा जोडण्याचे प्रयत्न करतात. (source – pexels)
-
अशात तुम्ही जर आपल्या पूर्व जोडीदाराला संधी देण्याचा विचार करत असाल तर पुढील बाबी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत करू शकतात. (source – pexels)
-
नाते तोडण्याचे कारण : नाते पुन्हा जोडण्यापूर्वी ते तुटण्याच्या कारणावर चर्चा करायचे विसरू नका. कारणावर चर्चा करून ते संपुष्टात न आणल्यास परत त्याच कारणावरून संबंध तुटू शकतात. (source – pexels)
-
भावना तपासा : ब्रेकअप नंतर अनेक लोक आयुष्यात पुढे जातात. जुना जोडीदार परत आल्यावर नाते पुन्हा जोडल्या जाते. मात्र, काहींना मनापासून हे नाते निभवणे शक्य होत नाही. (source – pexels)
-
म्हणून जुन्या जोडीदाराला संधी देण्यापूर्वी तुमच्या भावना काय आहेत त्या तपासा. जुन्या जोडीदाराविषयी प्रेम असल्यावरच नाते पुढे न्या. (source – pexels)
-
परत येण्याचे कारण जाणून घ्या – नाते तोडल्यानंतर परत येण्यामागे कोणते न कोणते कारण असेलच. (source – pexels)
-
परत नाते जोडण्यामागे जुन्या जोडीदाराचा काय हेतू आहे तो जाणून घ्या. चुकीचा हेतू असेल तर नात्यापासून दूर राहा. (source – pexels)
-
उणिवांना स्वीकारा : परस्परांतील उणिवांबाबत एकमेकांशी चर्चा करा. उणिवा स्वीकारून पुढे जाण्याची सहमती असल्यास नाते पुन्हा जोडण्याचा विचार करा. (source – pexels)
-
चेहऱ्यावरून ओळखा : कधीकधी चेहऱ्यावरील भावही जोडीदाराविषयी तुम्हाला माहिती देऊ शकतात. खरेच नाते जोडायचे असेल तर त्याचे प्रयत्न त्याच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून दिसून येतील. (source – pexels)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश