-
युरिक अॅसिड ही अशी एक समस्या आहे की ज्यामुळे सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास वाढू लागतो. युरिक अॅसिड हा शरीरामध्ये तयार होणारा विषारी घटक आहे. लघवीच्या मार्गाने किडनी हे घटक शरीराबाहेर टाकते.
-
जेव्हा तयार झालेले हे युरिक अॅसिड शरीरातून बाहेर पडत नाही तेव्हा ते हात आणि पायांच्या सांध्यामध्ये क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते आणि यामुळे संधिरोग होतो. युरिक अॅसिड जास्त असल्यास किडनी स्टोनची समस्याही वाढू शकते.
-
हिवाळ्यात शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखीची समस्या वाढू लागते. थंडीमुळे सांधेदुखी आणि जडपणा वाढू लागतो आणि वेदना जाणवतात.
-
हिवाळ्यात, मद्य, बिअर, मांस, सीफूड आणि मिठाई यांसारख्या काही पदार्थांच्या अतिसेवनाने शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यूरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी बटाटा खूप गुणकारी आहे.
-
बटाट्याचा रस काढून त्याचे सेवन केल्यास युरिक अॅसिडवर सहज नियंत्रण मिळवता येते. बटाट्याच्या रसामुळे यूरिक अॅसिड कसे नियंत्रित करता येते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
-
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल कोच ल्यूक कौटिन्हो यांच्या मते, बटाट्याच्या रसाचे सेवन केल्यास युरिक अॅसिड सहज नियंत्रणात आणता येते.
-
बटाट्याचा रस संधिरोग आणि युरिक अॅसिडच्या समस्येवर खूप प्रभावी आहे.
-
बटाट्यामध्ये कॅरोटीनॉइड्स नावाचे तत्व असते जे शरीरातून युरिक अॅसिड बाहेर काढण्यासाठी प्रभावी आहे. बटाट्याचा रस शरीरात जमा झालेले सर्व विषारी पदार्थ काढून टाकते. WebMD नुसार, ज्या लोकांना युरिक अॅसिडची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनी रोज बटाट्याच्या रसाचे सेवन करावे.
-
युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी बटाट्याचा रस कसा तयार करावा?
-
बटाट्याचा रस बनवण्यासाठी बटाटा धुवून त्याची साल काढून मिक्सरमध्ये मिक्स करून त्याचा रस काढा. या रसात थोडेसे खडे मीठ आणि काळे मीठ घालून त्याचे सेवन करा. बटाट्याच्या रसाचे रोज सेवन केल्याने युरिक अॅसिड सहज नियंत्रणात येईल.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Freepik)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम