-
ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक राशीच्या व्यक्तीचा एक विशिष्ट स्वभाव सांगण्यात आला आहे. कुंडलीप्रमाणेच वयांतीच्या राशीवरुण तिचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, भविष्य इत्यादीविषयी बरीच माहिती जाणून घेता येऊ शकते.
-
आज आपण आशा काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय स्वार्थी समजल्या जातात. अनेकदा आपले काम पूर्ण करण्याच्या नादात या व्यक्ती इतरांचा विचार न करता निर्णय घेतात.
-
वृषभ : या राशीचे लोक अतिशय मेहनती आणि कामसू असतात. एकदा हातात घेतलेले काम ते पूर्ण करूनच दाखवतात. यशस्वी होण्यासाठी ते कोणतीही सीमा गाठू शकतात. मात्र, आपले लक्ष्य गाठण्यात ते इतके मग्न होतात की अनेकदा लोक या राशीच्या लोकांना स्वार्थी आणि विश्वासघात करणारे लोक समजतात.
-
मिथुन राशीचे लोक बढाया मारण्यात हुशार असतात. त्याचबरोबर ते दुटप्पी मनाचे मानले जातात. मात्र, आपले काम पूर्ण करण्यात ते कोणतीही कसर सोडत नाहीत.
-
आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या नादात ते अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच इतर लोकांचा गैरसमज होतो. याशिवाय चमचगिरीच्या सवयीमुळेही त्यांची प्रतिमा खराब होते.
-
सिंह राशीच्या लोकांना नेहमी सर्वांच्या पुढे राहणे आवडते. यासाठी ते कोणतीही सीमा गाठू शकतात. तसे, या राशीचे लोक अतिशय मेहनती आणि कामसू असले, तरीही सर्वांच्या पुढे राहण्याच्या नादात ते आपल्या जवळच्या लोकांनाही नकळतपणे दुखावतात.
-
तूळ राशीचे लोक संतुलित स्वभावाचे मानले जातात आणि ते आपल्या ध्येयाच्या बाबतीत अतिशय जबाबदार असतात. मनात आलेल्या गोष्टी ते पूर्ण करूनच दाखवतात. यामुळे ते जीवनात यशस्वी होतात. पण इतर लोक या राशीच्या लोकांना स्वार्थी समजतात.
-
कुंभ राशीचे लोक गंभीर आणि आपल्या कामाप्रती एकनिष्ठ असतात. ते उगाच कोणाशीही बोलत नाहीत आणि कोणाबरोबरही वेळ घालवत नाही. ते चुकीच्या गोष्टी पाठीशी घालत नाहीत. म्हणूनच लोक या राशीच्या लोकांना विश्वासघाती समजतात.
-
येथे देण्यात माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो: Pexels)

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा