-
हिंदू पंचांगानुसार दर वर्षी वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय्य तृतीया असते. यंदा २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांची जयंतीदेखील असते.
-
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. योगायोगाने शेकडो वर्षांनी अक्षय्य तृतीयेलाच तब्बल ७ शुभ योग जुळून आले आहेत. २२ एप्रिलला गुरुदेव ग्रह हे मेष राशीत स्थिर होणार आहेत. चंद्रमा सुद्धा उच्च स्थानी असून वृषभ राशीत प्रभावी असणार आहेत.
-
कृतिका नक्षत्रात याच दिवशी आयुष्यमान योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, अमृत सिद्धी योग, त्रिपुष्कर योग असे राजयोग सुद्धा तयार होत आहे.
-
अक्षय्य तृतीयेपासून काही राशींसाठी संपत्ती आणि प्रगतीचा योग बनत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ‘या’ भाग्यशाली राशी..
-
सूर्य व गुरु मूळ मेष राशीतच प्रथम भावात स्थिर असल्याने मेष राशीसाठी येणारे नववर्ष हे सुवर्णसंधींनी भरलेले असू शकते. या राजयोगासह आपल्या व्यवसायात वृद्धीचे संकेत आहेत. आपल्याला शारीरिक व मानसिक ऊर्जा जाणवेल.
-
समाजातील मान-सन्मान वाढीस लागू शकतो. तसेच आपल्याला कामाच्या ठिकाणी सर्व ध्येय पूर्ण करता येऊ शकतात. याचा प्रभाव आपल्या वेतनावर व पदोन्नतीवर होऊ शकतो.
-
मकर राशीच्या चतुर्थ स्थानी गुरु सूर्य युती तयार होत आहे. हे स्थान भौतिक सुख व सुविधांचे केंद्र मानले जाते. येत्या काळात आपल्याला वाहन व भवन अशा दोन्ही गोष्टी प्राप्त करण्याची संधी लाभू शकते.
-
तुमच्या आई वडिलांसह नाते घट्ट होऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, अविवाहित लोकांकडे लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते.
-
मीन राशीच्या गोचर कुंडलीत दुसऱ्या स्थानी सूर्य व गुरुची युती तयार होत आहे. येत्या काळात आपल्याला वाणीवर काम करावे लागेल पण यातूनच तुम्हाला प्रचंड धनलाभ होण्याचे सुद्धा योग आहेत.
-
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामातून आपल्या प्रगतीची चिन्हे आहेत.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर