-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
अनेकदा काही योग शेकडो वर्षानंतर जुळून येतात. काही राजयोग हे प्रचंड दुर्मिळ असतात. येत्या २३ एप्रिलला असाच एक तब्बल ५०० वर्षांनी ‘केदार योग’ निर्माण होत आहे.
-
अभ्यासकांच्या माहितीनुसार, कोणत्याही राशीच्या जन्मकुंडलीत जेव्हा चौथ्या व सातव्या स्थानी ग्रह प्रबळ होतात तेव्हा हे स्थान अत्यंत शुभ मानले जाते.
-
केदार योग बनल्याने काही राशींसाठी संपत्ती आणि प्रगतीचा योग बनत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी सूर्य, गुरु, राहू, बुध विराजमान आहेत. तर दुसऱ्या स्थानी शुक्र व तिसऱ्या स्थानी मंगळ व चंद्र स्थिर आहेत. अकराव्या स्थानी शनिदेवाची कृपा असणार आहे. ही ग्रह स्थिती सुद्धा अत्यंत पवित्र मानली जाते, यामुळे अगोदरच राजयोग तयार होत आहेत.
-
याशिवाय शनिदेव अकराव्या स्थानी असल्याने मेष राशीला अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्तीची चिन्हे आहेत. जर कोणत्या नवीन कामाची सुरूवात करण्याचा मानस असेल तर हा काळ यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो.
-
केदार योग कर्क राशीतील मंडळीसाठी शुभ सिध्द होऊ शकतो. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नतीचा योग बनत आहे. यासोबतच तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल.
-
यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. या दरम्यान कामाच्या संदर्भात केलेले अनेक प्रवास तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतात. जोडीदारासोबत संबंध चांगले राहू शकतात. विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
-
ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, धनु राशीच्या गोचर कुंडलीत तिसऱ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या स्थानी केदार योग निर्माण होत आहे. ज्योतिष अभ्यासकांनी हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.
-
तसेच शेअर मार्केट गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो, कोर्टाच्या खटल्यांपासून शक्य तितके लांब राहणे उत्तम ठरेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ या काळात अपेक्षित आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा राहील. तुम्हाला जोडीदारासह सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर