-
शरीरात होणारे अनेक लहान-लहान बदलही मोठ्या आजाराचे संकेत असू शकतात. अशाच पद्धतीने लघवीमध्ये दिसून येणाऱ्या काही बदलांच्या मदतीने आपण ‘ब्लॅडर कॅन्सर’ सारखा आजार वेळीच ओळखू शकतो.
-
हा आजार ओळखण्यासाठी आपल्याला केवळ काही लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. असे केल्यास आपण हा गंभीर आजार ओळखून त्यावर तातडीने उपचार करू शकतो.
-
अॅक्शन ब्लॅडर कॅन्सर युकेनुसार वेळीच हा आजार ओळखता आल्यास जवळपास ८० टक्के लोक आपला जीव वाचवू शकतात.
-
बहुतेक लोक लघवीमध्ये होणारे बदल ओळखत नाहीत आणि यामुळे शारीरिक स्थिती आणखी गंभीर होऊ लागते. तुम्हाला जर पुढील लक्षणे दिसत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
-
लघवीतून रक्त येणे : एनएचएस यूके यानी डीइलेल्या माहितीनुसार लघवीमध्ये रक्त दिसणे ब्लॅडरचा गंभीर आजार झाल्याचे लक्षण असू शकते.
-
८० टक्के प्रकरणामध्ये हे लक्षण प्रामुख्याने दिसून येते. लघवीसह येणारे रक्त हे गुलाबी किंवा गडद लाल रंगाचे असू शकते. तसेच लघवीतून रक्त आल्यावर वेदना होणे गरजेचे नाही.
-
सतत लघवीला होणे : जर तुम्हाला सतत लघवीला होत असेल किंवा आकानक लघवीला होणार असल्याचे जाणीव होत असेल, तर हे ‘ब्लॅडर कॅन्सर’चे लक्षण असू शकते.
-
कंबर दुखणे : लघवी करत असताना जळजळ होण्याबरोबरच ओटीपोटी वेदना होणे, थकवा जाणवणे, त्याचबरोबर भूक कमी लागणे आणि हाडे दुखणे अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
-
‘ब्लॅडर कॅन्सर’ या गंभीर आजारपासून स्वतःचा बचाव कसा करावा?
-
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार जास्त पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने ब्लॅडर कॅन्सरचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
-
आपला आहार जितका निरोगी असेल, तितकाच हा आर होण्याचा धोका कमी राहील. विशेषतः धूम्रपान करणाऱ्यांना ब्लॅडर कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. म्हणून ही सवय सोडावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Freepik)

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल