-
आपल्या आजूबाजूला असे अनेक ‘टॅटूलव्हर्स’ असतील ज्यांना टॅटू बनवायला आवडते. (Photo : Pexels)
-
अनेक जण तर संपूर्ण शरीरावर टॅटू बनवतात तर काही लोक फॅशन किंवा ट्रेंड म्हणून टॅटूकडे बघतात. (Photo : Pexels)
-
तुम्हाला माहिती आहे का की, शरीराच्या कोणत्या भागांवर टॅटू बनवू नये ते़. टॅटू बनवण्यापूर्वी आपल्याला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात. (Photo : Pexels)
-
ज्या भागांवर टॅटू बनवल्यानंतर खूप जास्त त्रास होतो, अशा ठिकाणी टॅटू बनवू नये. शरीराच्या काही भागांवर टॅटू बनविणे खूप त्रासदायक ठरू शकते. (Photo : Pexels)
-
असं म्हणतात की शरीराच्या ज्या भागांवर चरबी कमी असते त्या ठिकाणी टॅटू बनवल्यानंतर जास्त त्रास होऊ शकतो. (Photo : Pexels)
-
पाय, घोटा, खांदा, बरगड्या, काखेत अशा कमी चरबी असणाऱ्या ठिकाणी टॅटू बनवू नका. (Photo : Pexels)
-
शरीराच्या प्रत्येक भागावर एकसारखा त्रास होतो, असे नाही. काही ठिकाणी जास्त; तर काही ठिकाणी कमी त्रास होऊ शकतो. (Photo : Pexels)
-
हल्ली क्रिकेटर्सपासून सिनेअभिनेत्यांपर्यंत अनेक जण टॅटू बनवतात आणि त्यामुळे टॅटू बनवण्याची क्रेझ तरुणाईमध्येही दिसून येते. (Photo : Pexels)
-
कुणी स्वत:चे नाव; तर कुणी प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराच्या नावाचा टॅटू काढतात. तुमच्या आवडीनुसार एकापेक्षा एक भारी डिझाइनचे टॅटू बनवून दिले जातात. (Photo : Pexels)

हॉस्पिटलमध्ये झालेली भेट ते लग्न, सयाजी शिंदेंची प्रेमकहाणी आहे खूपच खास; पत्नीने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा