-
एलपीजी सिलेंडर आपल्याला घरोघरी दिसते. या सिलेंडरमुळे जेवण बनविणे अधिक सोयीस्कर झाले, पण सिलेंडरमध्ये गरजेनुसार गॅस भरावा लागतो. (Photo : Loksatta)
-
अनेकदा अंदाज नसल्यामुळे सिलेंडरमधील गॅस संपतो आणि वेळेवर गॅस भरून आणण्यासाठी धावपळ करावी लागते. (Photo : Loksatta)
-
पण, तुम्ही सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज आधीच घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला आधीच कळणार आहे की गॅस संपणार आहे. (Photo : Loksatta)
-
सिलेंडरमधील गॅस लेव्हल तपासण्यासाठी एक ओला टॉवेल घ्या आणि सिलेंडरच्या भोवती गुंडाळा. यामुळे सिलेंडरची टाकी टॉवेलमुळे ओली झाल्यानंतर टॉवेल बाजूला काढा (Photo : Loksatta)
-
चेक करा की सिलेंडरचा कोणता भाग लवकर वाळत आहे आणि कोणता भाग जास्त वेळ ओला आहे? (Photo : Loksatta)
-
गॅस लेव्हल तपासण्यासाठी सिलेंडरचा ओला आणि कोरडा भाग नीट तपासा. (Photo : Loksatta)
-
जो भाग ओला आहे त्या भागात गॅस आहे असे समजावे, तर जो भाग कोरडा आहे त्या भागातला गॅस संपला आहे असे समजावे. (Photo : Loksatta)
-
सिलेंडरमध्ये एलपीजी (LPG) असते. या गॅसमध्ये काही प्रमाणात लिक्विडसुद्धा असते. (Photo : Freepik)
-
अशात सिलेंडरच्या जितक्या भागात गॅस असेल, तितका भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि लवकर वाळत नाही; पण ज्या भागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो. (Photo : Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल