-
प्रत्येकाला असं वाटतं की, त्यांचं घर स्वच्छ आणि सुंदर दिसावं. त्यामुळे आपण नेहमी घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. घराच्या स्वच्छतेचा विचार करताना बाथरूमची स्वच्छता केली जाणंही तितकीच महत्त्वाची आहे. (Photo : Freepik)
-
आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा बाथरूम स्वच्छ करणं गरजेचं आहे; पण अनेकदा बाथरूम स्वच्छ करताना आपण नळांकडे लक्ष देत नाही आणि काही काळानंतर हे नळ गंजल्याचे दिसून येते. (Photo : Freepik)
-
नळ स्टेनलेस स्टील किंवा लोखंडापासून बनलेले असतात; त्यामुळे त्यांना गंज लागल्यास ते खूप लवकर खराब होतात. (Photo : Freepik)
-
जर तुमच्या बाथरूमचा नळ गंजला असेल, तर टेन्शन घेऊ नका. काही खास टिप्सच्या मदतीने तुम्ही नळ चांदीसारखा चमकवू शकता. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ. (Photo : Freepik)
-
लिंबूमध्ये अॅसिडिक तत्त्वं असतात; ज्यामुळे नळावर चढलेला गंज लगेच निघून जातो. त्यासाठी गरम पाण्यात लिंबूचा रस व थोडे मीठ टाका. हे मिश्रण नळावर टाकून जुन्या टूथब्रशने घासा. नळ पूर्वीसारखा स्वच्छ दिसू शकतो. (Photo : Freepik)
-
स्वच्छतेसाठी व्हिनेगर खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. व्हिनेगरच्या मदतीने कोणतीही वस्तू लवकर स्वच्छ होते. जर तुमच्या बाथरूमचा नळ खराब झाला असेल किंवा काळा पडला असेल, तर व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही तो नव्यासारखा चमकवू शकता. (Photo : Freepik)
-
त्यासाठी एक कप चुना घ्या आणि त्यात मीठ व पाणी टाका. हे मिश्रण गंज लागलेल्या नळावर लावा आणि १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर त्यावर व्हिनेगर टाका आणि दोन मिनिटे ठेवा. स्क्रबरने हा नळ घासा. तुम्हाला हा नळ चांदीसारखा चमकताना दिसेल. (Photo : Freepik)
-
जर तुमच्या घरातील कोणताही नळ गंजला असेल, तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील बेकिंग पावडरचा वापर करू शकता. (Photo : Freepik)
-
बेकिंग पावडरमध्ये लिंबूचा रस पिळा आणि ते मिश्रण नळावर लावा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने नळ व्यवस्थित घासा. पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला नळ स्वच्छ झालेला दिसेल. (Photo : Freepik)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहरे कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला