-
सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा खूप आवडतो. (Photo : Pexels)
-
गणेशोत्सवात हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. पण, तुम्हाला गणपतीच्या तीन प्रिय राशी माहिती आहेत का? (Photo : Pexels)
-
बाप्पाला सर्वच राशी आवडतात, पण तीन राशी अति प्रिय आहेत. त्या राशींच्या लोकांवर नेहमी गणेशाची कृपा असते.आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Photo : Pexels)
-
मेष राशीच्या व्यक्तींवर बाप्पाची नेहमी कृपा असते. या राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे. या राशीचे लोक धैर्यवान, बुद्धिमान आणि हुशार असतात. (Photo : Pexels)
-
गणरायाच्या आशीर्वादामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात नाव कमवतात आणि आयुष्यात भरपूर धन, संपत्ती आणि यश मिळवतात. (Photo : Pexels)
-
मिथुन राशी बाप्पाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो; त्यामुळे या राशीवर नेहमी बाप्पाची कृपा असते. (Photo : Pexels)
-
गणपतीच्या आशीर्वादामुळे या राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो. घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना नेहमी फळ मिळते. (Photo : Pexels)
-
मकर राशीचे लोक खूप मेहनती आणि स्वभावाने खूप दयाळू असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर गणपतीची नेहमी कृपा असते. (Photo : Pexels)
-
बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि कोणत्याही अडचणींचा खंबीरपणे न घाबरता सामना करतात. (Photo : Pexels)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL