-
राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. आठवडाभरापासून येथील प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. प्रदूषित हवा आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या निर्माण करु शकते. या प्रदूषणामुळे कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
-
खरं तर, कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कर्करोगाचे लवकर निदान करणं, त्याचा प्रतिबंध आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी भारतात दरवर्षी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो.
-
देशात ज्या प्रकारे वायू प्रदूषणाचा धोका दरवर्षी वाढत आहे, ही स्थिती कर्करोगास कारणीभूत ठरु शकते का? याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
-
एका अभ्यासाद्वारे आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, वायू प्रदूषण हे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी कर्करोगाचे कारण ठरु शकते. उच्च पातळीमुळे स्तनाच्या कर्करोगापासून फुफ्फुस आणि घशाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
-
संशोधनानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या अंदाजे १० पैकी एक प्रकरणांमध्ये वायू प्रदूषण हे एक कारण असू शकते. वायुप्रदूषणाचे कण पेशींमधील डीएनएचे नुकसान करतात, ज्यामुळे जळजळ आणि कर्करोग होऊ शकतो.
-
एका अभ्यासानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये सर्वात जास्त वाढ अशा स्त्रियांमध्ये नोंदवली गेली आहे, ज्यांची प्रदुषण पातळी (PM 2.5) जास्त आहे. वाहनातून निघणारा धूर, जळते तेल, कोळसा किंवा लाकडाचा धूर इत्यादींमध्ये पीएम २.५ जास्त असते.
-
२०१८ मध्ये भारतातील महिलांमध्ये आढळलेल्या सर्व कर्करोगांपैकी २७.७ टक्के स्तनाच्या कर्करोगाचा वाटा आहे. देशात अंदाजे दीड लाखांहून अधिक महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. याला वायु प्रदूषणदेखील कारणीभूत असू शकते.
-
वायुप्रदूषणाचा धोका पूर्णपणे टाळणे कठीण आहे, मात्र, खबरदारी घेता येऊ शकते. प्रदूषित भागात जाणे टाळा. बाहेर जाताना मास्क वापरा. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य जीवनशैलीसह, योग्य आहार घ्या.
-
घरातील प्रदूषण देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. घरातील दूषित हवेच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याशिवाय सेकंडहँड स्मोकिंगमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी करण्यासाठी आणि कर्करोग टाळण्यासाठी उपाययोजना करा.

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा