-
पण आजकाल बाजारात पौष्टीकतेच्या नावाखाली नकली गुळ बनवण्याचे काम वाढले आहे. बाजारात बिनदिक्कतपणे बनावट गूळ मिळत आहे. (फोटो – freepik)
-
तुम्हाला माहितीच की, बनावट गूळ तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. हे खाल्ल्याने आपल्या शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. (फोटो – freepik)
-
आज आम्ही तुम्हाला बनावट गुळ आणि पौष्टीक गूळ ओळखण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. (फोटो – freepik)
-
ज्याद्वारे तुम्ही विकत घेतलेला गूळ खरा आहे की नकली हे तुम्ही सहज शोधू शकता. (फोटो – freepik)
-
नेहमी तपकिरी रंगाचा गूळ खरेदी करा. पिवळा किंवा हलका सोनेरी रंगाचा गूळ खरेदी करु नका, कारण तो खोटा असण्याची शक्यता आहे. (फोटो – freepik)
-
तुम्हाला बाजारात पांढरा, हलका पिवळा किंवा लाल असा नकली गूळ मिळेल. जर तुम्ही ते पाण्यात टाकले तर भेसळयुक्त पदार्थ भांड्याच्या तळाशी जातील, तर शुद्ध गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल.(फोटो – freepik)
-
शुद्ध गुळ किती कडक आहे हे देखील ओळखता येतं. गूळ जितका कडक तितकाच त्याच्या शुद्धतेची हमी जास्त असते. अशा स्थितीत बाजारातून गूळ घेण्याआधी पहा, तो कडक आहे की नाही?(फोटो – freepik)

