-
नवं वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षात आपण अनेक गोष्टी ठरवतो ; ज्या आपल्याला वर्षभरात पूर्ण करायच्या असतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
पण, करियरमध्ये यश प्राप्त करताना बऱ्याचदा मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबाकडे पुरेसा लक्ष किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवता येत नाही. यादरम्यान आहाराकडेही दुर्लक्ष होत आणि त्याचा मनावर तसेच शरीरावर परिमाण होतो. तर येत्या वर्षात तुमच्या दिनचर्येत थोडा बदल करून पहा आणि काही आवडते छंद जोपासा. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
व्यायाम, आहारात बदल, आदी गोष्टींबरोबर तुम्ही पुढील पाच सवयी तुमच्या दैनंदिन आयुष्यात लावू शकता आणि तणावमुक्त जीवन जगू शकता. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
१. वाचन करा : तुमच्या रोजच्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी पुस्तक वाचणे हा छंद आनंददायी ठरू शकतो ; यामुळे तुमचे वाचन आणि लेखन कौशल्य सुधारण्यास मदत होईल. येत्या वर्षात पाच किंवा दहा पुस्तके वाचण्याचे उद्दिष्ट ठेवा. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
२. नवीन भाषा शिका : नवीन वर्षात एखादी नवीन भाषा कशी बोलायची किंवा लिहायची याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. कला : तुम्ही ओरिगामीही कला शिकून कागदापासून विविध गोष्टी तयार करण्याचा मजेशीर आनंद घेऊ शकता. किंवा वहीवर दररोज छान चित्र काढा आणि त्यांना विविध रंगानी रंगवा.(फोटो सौजन्य:@Freepik)
-
४. खेळ खेळा : धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून एखादा मैदानी खेळ म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आदी खेळ खेळा आणि दिवसभराचा तणाव दूर करा. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
५. फोटोग्राफी : काही जणांना झाडे, पाने, फुले आदी गोष्टींचे फोटो काढायला खूप आवडतात. तर तुम्ही देखील विविध नवीन ठिकाणांना भेट द्या आणि तुमच्या कॅमेरा किंवा मोबाईलफोनमध्ये तेथील सुंदर क्षण कॅप्चर करा आणि तुमच्या सोशल मीडियावर शेअर करा आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. (फोटो सौजन्य:@Freepik)

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल