-
आपल्या सर्वांनाच फिरायला आवडते पण प्रवास करताना बस, ट्रेन किंवा विमानाने लांबचा प्रवास काहींना जमत नाही. मळमळ, उलटी होणे यांसारख्या समस्यांमुळे अनेक जण इच्छा असूनही प्रवास करणे टाळतात. (फोटो : Freepik)
-
तुम्हीही यापैकीच असाल तर काळजी करु नका. आणि तुमची ट्रिप अजिबात रद्द करु नका. कारण आम्ही तुमच्यासाठी प्रवासादरम्यान उलट्या किंवा चक्कर येण्याचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आणले आहेत. (फोटो : Freepik)
-
इथून पुढे नेहमी प्रवास करताना या दोन गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. तुमची ट्रिप एकदम मस्त होईल. आणि तुम्हाला ट्रिपचा पुरेपूर आनंदही लुटता येईल. (फोटो : Freepik)
-
वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. (फोटो : Freepik)
-
मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. मात्र तुम्हाला या त्रासापासून वाचवायचं असेल तर खाली दिलेल्या काही सोप्या टिप्स फॉलो करा. (फोटो : Freepik)
-
प्रवासादरम्यान, तुम्ही एक घरगुती पावडर तयार करून ती तुमच्यासोबत ठेवा. ही पावडर कशी बनवायची जाणून घेऊयात. (फोटो : Freepik)
-
ओवा, बडीशेप आणि जिरे घ्या. ते मंद आचेवर भाजून घ्या, थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात पावडर बनवा. ही पावडर बाटलीत भरून किंवा हवाबंद डब्यात ठेवून प्रवास करताना सोबत घेऊ शकता. (फोटो : Freepik)
-
ही पावडर खाल्ल्यानंतर तुम्हाला उलट्या किंवा चक्कर अजिबात जाणवणार नाही. आणि यामुळे तुमची पोटाची समस्या दूर होईल आणि तुमचा मूडही फ्रेश राहील. (फोटो : Freepik)
-
जेव्हाही तुम्हाला उलटी, मळमळ किंवा चक्कर येत असेल तेव्हा ही पावडर तोंडात टाका. यामुळे तात्काळ आराम मिळेल. (फोटो : Freepik)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया