-
मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही.(फोटो : Freepik)
-
मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. (फोटो : Freepik)
-
तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. (फोटो : Freepik)
-
स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते. यातही दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट आणि मेंचट होऊन जाते. (फोटो : Freepik)
-
एका गृहिणीने दाखवलेल्या या ट्रिकमध्ये संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाका आणि कमाल पाहा. (फोटो : Freepik)
-
स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे मीठ टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा. (फोटो : Freepik)
-
१५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा. मीठामुळे शेगडी एकदम चकाचक दिसेल. (फोटो : Freepik)
-
आतापर्यंत तुम्ही भांड्याचा साबण आणि लिक्विडने गॅस साफ केला असेल, मात्र एकदा मीठ वापरुन नक्की पाहा. (फोटो : Freepik)
-
@ Prajakta salveयूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. (फोटो : Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल