-
आपण अननसाचा ज्यूस, केक किंवा अननस घातलेला शिराही खातो. मात्र अननस म्हणावा तितका खाल्ला जात नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अननस खाण्याचा नेहमीच कंटाळा केला जातो. बाजारात अननसाचे काप केलेले पॅकेट फार कमी ठिकाणी उपलब्ध असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, आरोग्यासाठी इतर सर्व फळांबरोबरच अननस अतिशय उपयुक्त आहे.पाहूयात काय आहेत अननस खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे : हिवाळ्यात, सर्दी आणि ताप येणे सामान्य आहे. तर अननसात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
पोषक तत्वांनी समृद्ध: अननस जीवनसत्त्वे C, B6, आणि मॅंगनीज आणि कॅल्शियम यांसारख्या खनिजांसह पोषक द्रव्यांचा समृद्ध स्त्रोत्र आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
पचनशक्ती सुधारण्यास उपयुक्त : अननसात आढळणारे ब्रोमेलेन हे एक एन्झाइम असते . ते पाचन समस्यांवर मात करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
वजन कमी करण्यास मदत : अननसामध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते ; जे वजन कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
अननसात असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि स्नायूंच्या दुखतीपासून आराम देतात. (फोटो सौजन्य:@Freepik)

“सनी देओल माझ्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय, देव सगळं बघतोय, न्याय होईल”