-
बदलत्या ऋतूमध्ये कोरडा खोकला खूप त्रासदायक असतो. कोरड्या खोकल्यामुळे ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, दमा, ऍलर्जी आणि सर्दी यांसारख्या फुफ्फुसाच्या समस्या उद्भवू शकतात.
-
काही लोक आहारातील बदलांमुळेही आजारी पडतात. धूम्रपान करणाऱ्या लोकांना कोरड्या खोकल्याचा जास्त त्रास होतो.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला जास्त खोकला, डोळे पाणी, नाक चोंदत असेल तर लगेच ही घरगुती उपाय वापरून आराम मिळवू शकता.
-
जर तुम्हाला कोरडा खोकला आणि सर्दी होत असेल तर तुम्ही आले मिरी, दालचिनी, लवंग आणि तुळस यांचा एक काढा करुन प्या.
-
दिवसातून २ वेळा या काढ्याचे सेवन केल्याने तुम्हाला कोरडा खोकला आणि सर्दीपासून आराम मिळेल.
-
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात
-
आल्यामध्ये असलेले जिंजरॉल आणि शोंगोल शरीरातील दाहकता कमी करतात आणि सूज दूर करतात.
-
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील अँटीबॉडीजचे वाढतात.
-
मिरपूड दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ज्यामुळे सर्दीपासून आराम मिळतो.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”