-
हल्ली अनेकांच्या घरात भांड्यांचा स्टँडऐवजी किचन ट्रॉलीज दिसून येतील. किचनमधील लहान-मोठ्या भांड्यांपासून वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी अगदी आरामात यात ठेवता येतात.
-
विशेषत: भांडी धुतल्यानंतर ती कोरडी न करताच ट्रॉलीमध्ये ठेवल्याने त्याच मोठ्याप्रमाण घाण जाऊन जमा होते. शिवाय आतून गंज येत त्यात बुरशीचे प्रमाण वाढते. म्हणून ट्रॉलीच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अशावेळी या ट्रॉलीज साफ करण्यासाठी नेमक्या कोणत्या ट्रिक्स वापरायच्या जाणून घेऊ….
-
किचनमध्ये बसवलेली भांडीची ट्रॉली महिन्यातून किमान एकदा साफ करायला हवी, यामुळे तुम्ही ट्रॉलीची चमक कायम ठेवू शकता. मात्र, पावसाळ्यात त्याची वारंवार साफसफाई करावी लागते. कारण पावसातील दमट वातावरणात ओल्यामुळे त्यात बुरशी वाढू शकते.
-
किचन ट्रॉलीमध्ये आतून अनेकदा खूप तेलकट, चिकट होतात. अशावेळी त्या साफ करण्यासाठी एका भांड्यात १ चमचे मीठ, बेकिंग सोडा, डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट स्क्रबरच्या साहाय्याने ट्रॉलीला लावा आणि स्वच्छ करा. यामुळे ट्ऱॉलीवरील घाणी आणि गंजाचे डाग निघून जातील.
-
तुम्ही स्क्रबरऐवजी ब्रशही वापरू शकता. पण ट्रॉली साफ करताना त्यात पाण्याचा एक थेंबही सांडणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा संपूर्ण ट्ऱॉली गंजण्याची शक्यता आहे.
-
ट्रॉलीची घाण साफ केल्यानंतर त्याची चमक वाढवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी ट्रॉली पूर्णपणे सुकल्यानंतर कापसाच्या बॉलमध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब घाला आणि संपूर्ण ट्रॉलीवर लावा. त्यामुळे ट्रॉली लवकर गंजणार नाही आणि ट्रॉलीची चमकही वाढेल.
-
खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेलही वापरू शकता. तसेच ते वापरताना प्रमाणाची विशेष काळजी घ्यावी. तेल लावल्यानंतर ट्रॉलीत सामान ठेवण्यापूर्वी सुमारे १ तास ओपन ठेवा.
-
ट्रॉलीमध्ये कधीही ओली भांडी ठेवू नका .दमट वातावरणात दररोज ट्रॉली कोरड्या कापड्याने स्वच्छ करा.
-
ली ओल्या कापडाने पुसल्यानंतर सुकण्यासाठी ओपन करुन ठेवा. ट्रॉलीतील कप्पे बाहेर निघणारे असतील तर तुम्ही एक-एक कप्पा बाहेर काढून स्वच्छ करा. (सर्व फोटो – Freepik)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा