-
पलंगावरील गादीला आपण चादरीने (बेडशीट) कव्हर करतो, नाहीतर गादी लवकर खराब होण्याची शक्यता असते.
-
अनेकांच्या घरात तुम्हाला विविध प्रकारच्या गादीवर चादर पाहायला मिळाले. गादीच्या आकारानुसार तुम्ही लहान-मोठ्या चादरीचा वापर केला जातो. प्रत्येक सणासुदीला आपण पलंगावरील चादर बदल असतो.
-
या चादरी सततच्या वापरामुळे खूप मळकट होतात. त्यातून कुबट वास येऊ लागतो. यामुळे काही लोक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बेडशीट बदलतात. तर काही लोक महिन्यातून एकदा बेडशीट बदलतात.
-
अशावेळी बहुतांश लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, बेडशीट महिन्यातून किती दिवसांनी बदलणे योग्य आहे?. चलातर जाणून घेऊया या प्रश्नाचे योग्य उत्तर…
-
तुम्ही देखील एकच बेडशीट खूप दिवस वापरत असाल तर काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. एका अहवालानुसार, हजारो मृत त्वचेच्या पेशी, धूळ, तेल इत्यादी घाण गोष्टी बेडशीटवर जमा होतात ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. यामुळे बेडशीटवर एकाचवेळी घाण आणि बॅक्टेरिया जास्त काळ वाढतात.
-
अशाने तुम्हाला त्वचेच्या समस्या देखील उद्धवू शकतात. तसेच इतर आजारांचा धोका वाढतो. यामुळे बेडशीट दर चार ते ५ दिवसांनी बदलणे गरजेचे आहे.
-
पलंगावर महिनाभर तीच चादर वापर असाल तर तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चादर आठवड्यातून एकदा तरी बदला.
-
घरात जर पाळीव प्राणी असतील तर दर दोन दिवसांनी एकदा चादर बदलली पाहिजे. याशिवाय एखादा आजारी व्यक्ती पलंगावरील चादरीवर झोपला असेल तर दुसऱ्या दिवशी ती चादर लगेच धुवून टाका. तसेच आजारी व्यक्ती झोपलेल्या चादरीवर तुम्ही झोपू नका, अशाने तुम्ही देखील आजारी पडण्याचा धोका असतो.
-
बहुतेक लोक बेडशीट धुताना एक मोठी चुक करतात ती म्हणजे अंगावरील कपड्यांमध्ये चादरी धुतात, चादरी नेहमी वेगळ्या धुतल्या पाहिजेत कारण त्या व्यवस्थित धुण्याची गरज असते.
-
चादर स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत म्हणजे ती प्रथम कोमट पाण्यात डिटर्जेंट घालून भिजत ठेवा. यानंतर ब्रशने किंवा वॉशिंगमध्ये धुवा. नंतर कोरडी करुन उन्हात सुकण्यासाठी लटकवा. ( सर्व फोटो – Freepik)

“बलात्कार करायला घरी माणसं पाठवू, अशा धमक्या देतात, माझ्या मागे…”, आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे फुके कुटुंबावर गंभीर आरोप