-
मुली असो महिला, प्रत्येकीलाच आपले केस सुंदर आणि चमकदार हवे असतात.पण जर
नीट काळजी घेतली नाही तर केस गळू लागतात. -
रात्रीचे काम संपवून आपण सरळ झोपी जातो. पण, रात्री झोपण्यापूर्वी केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे आणि पुढील गोष्टी केल्या पाहिजेत.
-
सॅटिन उशी वापरा: ज्यांना केस गळण्याची समस्या आहे त्यांनी सॅटिन उशीचा वापर करावा. सॅटिनच्या उशीवर झोपल्याने केसगळतीपासून सुटका मिळेल आणि शांत झोप मिळेल.
-
झोपण्यापूर्वी केसांना विंचरा: केसांचा गुंता टाळण्यासाठी रात्री केस विंचरा. -
रात्री झोपताना रबर बँड आणि हेअर क्लिप घातल्याने केस आणि स्कॅल्पवर ताण येऊ शकतो. त्याऐवजी स्क्रंचीची निवड करा कारण ते केस तुटणे टाळण्यास मदत करतात
-
केसांना तेल लावा: रोज केसांना तेल लावा आणि रात्री झोपण्यापूर्वी मालिश करा. -
ओल्या केसांनी झोपू नका: बहुतेक लोक रात्री आंघोळ केल्यानंतर ओल्या केसांनी झोपतात. या सवयीमुळे केस गळू शकतात. त्यामुळे केस ओले ठेवून झोपू नका.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल