-
अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही दररोज ३ ते ४ लिटर पाणी प्यायले तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. (Photo: Freepik)
-
बहुतेक लोक जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेचच पाणी पितात. हे टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. (Photo: Freepik)
-
डॉक्टर सांगतात की जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ॲसिडिटी सारख्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. (Photo: Freepik)
-
चला जाणून घेऊया जेवणानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत आणि जेवणानंतर किती वेळानंतर पाणी प्यायलं पाहिजे. (Photo: Freepik)
-
जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे काय तोटे आहेत? लठ्ठपणा वाढू शकतो.पचनाच्या समस्या होऊ शकतात. पोटात गॅस सारख्या समस्या असू शकतात. रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. (Photo: Freepik)
-
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान दोन तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. (Photo: Freepik)
-
त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर किमान ४५ ते ६० मिनिटांनंतर पाणी प्यावे. जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायचे असेल तर अर्धा तास आधी प्यावे. (Photo: Freepik)
-
जेवणानंतर एक तासाने पाणी प्यायल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास कधीच होणार नाही. (Photo: Freepik)
-
जेवल्यानंतर योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था मजबूत होते. (Photo: Freepik)

राज्यात २४ ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; ‘या’ भागात पडणार सर्वाधिक पाऊस