-
सध्याच्या धावपळीच्या जगात माणसाला कोणासाठी हवा तसा वेळ काढता येत नाही. काही जण तर नोकरीसाठी त्यांच्या घरापासूनच लांब दुसऱ्या शहरात राहायला येतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे अनेक जण एकटे राहणं पसंत करतात. ही एकटं राहण्याची सवय इतकी होते की, मित्र-मैत्रिणींना कमी भेटणं, एखादा प्लॅन रद्द झाला की, खुश होणं, पार्टी किंवा नवीन लोकांमध्ये गेल्यावर जास्त गप्पा न मारणं असे आपल्यातील बरेच लोक करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, एकटं राहिल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. जर तुम्हाला देखील असे वाटत असेल तर तुम्ही तणावापासून दूर राहण्यासाठी पुढील काही सवयी लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
घरातील तुमची आवडती जागा म्हणजेच बाल्कनी, हॉल किंवा बेडरूम या ठिकाणी गाणी, पुस्तक वाचण्यात वेळ घालवा ; यामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आरोग्याला प्राधान्य द्या – एकटे राहत असाल तर आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत जेवण आणि नाश्ता करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दिनचर्या – एक दिनचर्या ठरवा. स्वतःला व्यस्त ठेवा म्हणजे नकारात्मक विचारांपासून तुम्ही दूर रहाल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कुटुंबातील सदस्य, आवडती व्यक्ती किंवा मित्र मैत्रिणींशी नेहमी संपर्कात रहा. त्यांना भेटा व तुमच्या मनातील गोष्टी शेअर करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. गार्डन किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात चालायला जा. यामुळे तुम्हाला तणाव कमी होण्यासाठी फायदेशीर ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही जर एकटे राहत असाल तर तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आरोग्यदायी सवयी समाविष्ट करा ; जसे की स्वत:ची काळजी घ्या, शारीरिक हालचाल करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

अखेर ३ महिन्यांनी पैसाच पैसा! राजयोगामुळे ‘या’ राशींच्या नशिबात फक्त प्रमोशन, पगारवाढच नाही तर…