-
Kitchen Hacks : स्वयंपाकघरात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गॅस शेगडी, ज्याशिवाय जेवण तयार करणे अवघड आहे. भलेही आज स्वंयपाकघरात इंडक्शन किंवा मायक्रोव्हेवचा वापर होत असला तरीही काही गोष्टींसाठी गॅस शेगडीवरच अवलंबून राहावे लागते.
-
गॅस शेगडी वापरण्याची एक वेगळी पद्धत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने गॅस शेगडी वापरताना काय काळजी घ्यावी याकडे लक्ष दिले पाहिजे.
-
कित्येक लोक गॅस शेगडीचा वापर करत नसल्यास सिलेंडर बंद करतात पण कित्येक लोक फक्त गॅस शेगडीचे बटण बंद करतात.
-
काही लोक गॅस शेगडी चालू करताना लायटर वापरतात तर काही लोक काडेपेटी वापरतात. गॅस शेगडी चालू किंवा बंद करण्याच्या बाबतील काही गोष्टींचा संबंध थेट सुरक्षिततेशी असतो
-
गॅस शेगडी पेटवताना या गोष्टींची घ्या काळजी
जर तुम्ही काडीपेटीने गॅस शेगडी पेटवत असाल तर आधी काडी पेटवा मग गॅस शेगडीचे बटण चालू करा म्हणजे पटकन गॅस शेगडी पेटवता येईल. -
लोक नेहमी काडीपेटीने पेटविण्याआधीच गॅस शेगडीचे बटण चालू करतात.
-
गॅस चालू करताना कदाचित तुमच्याकडून अनवधानाने काही चुका होऊ शकतात, ज्या नंतर धोकादायक ठरू शकतात. चला जाणून घेऊ या गॅस शेगडी चालू करण्याची योग्य पद्धत आणि सुरक्षिततेसाठी काही टिप्स.
-
. यामध्ये गॅस वाया तर जातोच, पण हवेत जास्त गॅस पसरतो आणि काडी पेटवल्यानंतर मोठी आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हात भाजण्याचादेखील धोका निर्माण होतो
-
गॅस पेटवताना त्याचे सेटिंग कमी ठेवावे म्हणजेच नॉबने गॅसचा फ्लो कामी ठेवून लायटर किंवा काडी पेटवावी.
-
त्यानंतर तुम्ही स्वत:च्या सोयीनुसार गॅस शेगडीची आच कमी-जास्त करू शकता.पण गॅस शेगडी चालू करताना आच मोठी ठेवल्यास जास्त गॅस बाहेर पडतो आणि मोठी ज्योत पेटू शकते.
-
काडीपेटीने गॅस पेटत नसेल तर गॅस बंद करा आणि पेटवलेली काडी विझवा. गॅस शेगडीमधून येणारा गॅस हवेमध्ये मिसळतो.
-
अशात गॅस बंद ठेवला तरी काडीपेडीची काडी पेटवल्यानंतर हवेत पसरलेला गॅस धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काही वेळ थांबावे आणि मग पुन्हा प्रयत्न करावा
-
काडीपेटीऐवजी लायटरने गॅस पेटवण्याचा सल्ला दिला जातो, कारण काडीपेटी वापरताना थोडासा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.

अमेरिकेचं पाकिस्तानी लष्करप्रमुखांना ‘आर्मी डे’ परेडचं निमंत्रण? व्हाइट हाऊसकडून पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोल