-
सध्याच्या घडीला वाढत्या वजनाने त्रस्त असणारा प्रत्येक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण- लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे.
-
वजन कमी करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी काही पर्याय सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.
-
खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरू लागलेय.
-
पोहण्यामुळे वेगाने वजन कमी करता येते; ज्यांचे वजन जास्त आहे ते पोहण्याने आपले वजन कमी करू शकतात.
-
शरीरातील चरबी कमी होण्याकरिता अॅरोबिक्सचा व्यायाम केला जातो. या व्यायामांमुळे बाॅडी फॅट बर्न होतात. अॅरोबिक व्यायाम तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता.
-
जर तुमचे वजन वाढत असेल आणि कामाच्या व्यग्रतेमुळे तुम्हाला जिममध्ये जाऊन वर्कआउट करता येत नसेल, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला सुरुवात करा.
-
शारीरिक हालचालींसोबतच आहारातून कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित चालत असाल, तर त्यामुळे कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी चालणे हा खूप सोपा मार्ग आहे.
-
वजन कमी करण्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आहारामध्ये भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
-
आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्या, बिया असणाऱ्या भाज्या आदी पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : freepik )

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल