-
वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकदा वजन कमी करणे कठीण जाते. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन वजन नियंत्रणात ठेवायला हवं. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर यावर उपाय म्हणून तुम्ही पुढील काही ज्यूसचा आहारात समावेश करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
वजन कमी करण्यासाठी कोणते पाच प्रकारचे रस घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल चला पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
बीटाचा रस – बीटामध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते ; जे तुम्हाला पोट भरण्यास व वजन कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गाजराचा रस – गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन भूक भागवते, पचन वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
हिरव्या भाज्यांचा रस – भाज्या जीवनसत्त्वं, खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असतात. त्यामुळे शरीरातल्या पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. पालक, कोबी यांसारख्या भाज्या आरोग्यदायी पेये आहेत. कारण या अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने भरलेल्या असतात आणि त्यात साखर कमी असते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
काकडीचा रस – काकडीचा रस हे हायड्रेटिंग पेय आहे ; जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
कोरफडचा रस – कोरफडीमुळे चयापचय सुधारतं. यामुळे शरीरात साठलेले फॅट्स बर्न होतात आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात. (फोटो सौजन्य: @Freepik )

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश