-
हवेतला गारठा वाढला की अनेकांना चहा पिण्याची इच्छा होते. काम करताना झोप उडवण्यापासून ते सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी चहा फायदेशीर ठरतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
बदलत्या काळानुसार हॉटेल, रेस्टॉरंट्स, कॅफेमध्ये अनेक चहाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तसेच चहा बरोबर काही खास सेवन केल्यास चहा आणखीन स्वादिष्ट लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर चहा बरोबर खाल्ले जाणारे सर्वात लोकप्रिय पदार्थाची आज आपण यादी पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पोहा – ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. पोहे, हळद, कांदा, शेंगदाणे आणि तेल, मोहरी आणि कढीपत्ता घालून गरमागरम पोहे तयार केले जातात. हा एक फायबर समृद्ध पदार्थ आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
खारी – गव्हाच्या पिठा पासून बनवलेली खुसखुशीत आणि हेल्दी खारी चहा बरोबर खाण्याची मजा काही वेगळीच आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
रस्क टोस्ट – रस्क टोस्ट हा एक प्रकारचे कुरकुरीत बिस्किट किंवा ब्रेड आहे ; जो सहसा नाश्ता म्हणून किंवा चहा किंवा कॉफीसह खाल्ला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ब्रेड बटर – बटर किंवा तुप लावलेलं ब्रेड स्लाइस यांचा आनंद चहा बरोबर अनेक जण घेतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
बन मस्का – बटर लावलेला मऊ आणि कुरकुरीत असा बन मस्का लहान मुलांच्या आवडीचा आहे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
फाफडा – बेसन (बेसन) पासून बनवलेला डीप-फ्राय तळलेला पदार्थ चटणीसोबत खाल्ला जातो व हा चाय बरोबर स्वादिष्टही लागतो. (फोटो सौजन्य: @Freepik )

IND vs ENG: याला म्हणतात खेळभावना! वोक्सची दुखापत पाहताच करूण-सुंदरने…; दोघांनीही जिंकली सर्वांची मनं; VIDEO व्हायरल