-
ज्योतिषशास्त्रात मंगळ या ग्रहाला विशेष महत्त्वं आहे. मंगळ हा आक्रमकता, उत्साह, धैर्य, शक्ती, उर्जा, जमीन आणि विवाह यांचा कारक मानला जातो.
-
ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळाला संबोधले जाते, तसे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. मंगळाने १५ मार्चला शनिच्या कुंभ राशीत गोचर केलं आहे.
-
यानंतर मंगळ एप्रिलमध्ये राशी बदल करणार आहेत. मंगळदेव शनिदेवाच्या राशीत २२ एप्रिलपर्यंत विराजमान राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना मंगळाच्या कृपेने गोड बातम्या मिळू शकतात.
-
या काळात बँक बॅलेन्स वाढण्याची शक्यता आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
-
मंगळदेवाचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला पैसे कमाविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात.
-
मंगळदेवाचे राशीपरिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस घेऊन येणारे ठरु शकते. नोकरीत बदल, नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. अनेक महिन्यांपासून रखडलेले काम मार्गी लागू शकतात.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळदेवाचे राशीपरिवर्तन लाभदायी ठरु शकते. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. ज्यामुळे समाजात तुमचा सन्मान होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरु शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS