-    चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि मुलायम असावी असे प्रत्येक तरुणी आणि महिलांना वाटते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    पण, उन्हाळ्यात उष्णतेमुळे चेहऱ्यावर मुरूम, डाग तर कधी सुरकुत्या दिसू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने चेहऱ्यावर मुरूम येतात. या मुरुमांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अनेकदा त्वचेवर जळजळ सुद्धा जाणवते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    त्यामुळे तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य स्किनकेअर रूटीनचे पालन करणेही आवश्यक आहे.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    उन्हाळ्यात मुरुमांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    चेहरा वारंवार धुवा – उन्हाळ्यात वारंवार चेहरा धुणे आवश्यक आहे ; ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम येणार नाहीत. तसेच तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझिंग फेस वॉश वापरा. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    टोनर वापरा – टोनर तुमच्या त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित करतात. टोनर चेहऱ्यावरील मुरुम फुटण्यास प्रतिबंध करते आणि चेहरा थंडगार ठेवते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
-    सनस्क्रीन लावा – उन्हाळ्यात प्रदूषण आणि सूर्याच्या किरणांमुळे त्वचा टॅन आणि मुरुमांपासून बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य: @Freepik) 
-    हायड्रेटेड रहा – पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: उन्हाळ्यात, कारण ते तुमची त्वचा हायड्रेट ठेवते, तुमचे शरीर डिटॉक्स करते आणि मुरुमांपासून बचाव करते. (फोटो सौजन्य: @Freepik) 
 
  महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  