-
सुट्टीच्या दिवशी अनेक घरांमध्ये मासे अशाप्रकारचे नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. मात्र मासे किंवा मच्छीला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. माश्याचे कालवण किंवा फिश फ्रायसारखे पदार्थ बनवल्यानंतर त्याचा वास, दर्प खूप वेळासाठी स्वयंपाकघरात राहतो. [Photo credit – Freepik]
-
अशावेळेस जर कुणी घरी आले किंवा कुणी पाहुणेमंडळी घरी येणार असल्यास हा दुर्गंध घालवण्यासाठी आपण सुगंधी स्प्रे, रूम फ्रेशनरचा उपयोग करून पाहतो. परंतु असे उपाय तात्पुरते फायदेशीर ठरतात आणि पुन्हा घरात माश्याचा दुर्गंध येऊ लागतो. [Photo credit – Freepik]
-
असे होऊ नये त्यासाठी अतिशय सोप्या आणि उपयुक्त टिप्स एनडीटीव्हीच्या एका लेखामधून सांगितले असल्याचे दिसते. काय आहेत या चार टिप्स पाहा. [Photo credit – Freepik]
-
१. कापूर जाळणे
कापराच्या सुगंधामुळे, घरातील घाणेरडा वास किंवा दुर्गंध घालवण्यास मदत होते. त्यामुळे, मच्छीचा वास येत असल्यास घरात किंवा स्वयंपाकघरात एक-दोन कापराच्या वड्या जाळू शकता. [Photo credit – Freepik] -
२. लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर
एका लहानश्या पातेल्यामध्ये थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित उकळून घ्या. लिंबाचा रस उकळत असताना वा व्हिनेगर आणि पाणी उकळत असताना त्याच्या येणाऱ्या हलक्या गंधामुळे, माश्याचा वास नाहीसा होण्यास मदत होते. [Photo credit – Freepik] -
३. दालचिनी आणि लवंगीचा वापर
एका पातेल्यात पाणी घ्या, त्यामध्ये थोडी दालचिनी आणि लवंग घालून उकळून घ्यावे. मसाले उकळत असताना, पातेल्यावर झाकण ठेऊ नका. लवंग आणि दालचिनी पाण्यात उकळून घेतल्याने घरातील हवेमधील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल. [Photo credit – Freepik] -
४. दरवाजे आणि खिडक्यांचा वापर
मच्छीची दुर्गंध लवकरात लवकर घालवायची असल्यास स्वयंपाक घरातील खिडक्या, बाल्कनीचे दरवाजे उघडून ठेवा. घरामध्ये येणाऱ्या हवेमुळे, सुर्प्रकाशामुळे असे वास निघून जाण्यास मदत हते. म्हणून शक्य असेल तेव्हा घरातील सर्व दारं-खिडक्या उघडून घरातील हवा खेळती ठेवावी. [Photo credit – Freepik]

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा