-
एप्रिल महिना संपत नाही तोच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वच लोक हवालदिल झाले असून येणाऱ्या दिवसांमध्ये तापमान आणखीनच वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
दिवसेंदिवस वाढणारी गरमी आता असह्य होऊ लागली आहे. यापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत.
-
बहुतांश घरांमध्ये दिवसभर पंखा चालू असतो, तर काहीजण अशा दिवसांमध्ये कूलरचा आधार घेताना दिसत. अशातच आता एसी वापरणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे.
-
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसीचा वापर वाढलेला पाहायला मिळतो. शहरच नाही, तर गावांमध्येही लोकं गरमीपासून वाचण्यासाठी एसीला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. मात्र, एसीच्या वापराचे काही गंभीर परिणामही होऊ शकतात.
-
एसीमधील हवा आपल्याला आजारी करू शकते. या हवेमुळे आपल्याला अनेक आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता कित्येक पटीने वाढत आहे.
-
तुम्हीही उन्हाळ्यातील गरमीपासून वाचण्यासाठी तासंतास एसीमध्ये बसत असाल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण एसीमधून निघणाऱ्या हवेच्या दुष्परिणामांमुळे तुम्ही आजारी पडू शकता.
-
काही हेल्थ रिपोर्ट्सनुसार, तुम्ही जर एसीमध्ये जास्त वेळ बसत असत तर ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’ वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी, कोरडा खोकला, थकवा, चक्कर येणे, लक्ष न लागणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.
-
खूप वेळ एसीमध्ये राहिल्याने शरीरातील आर्द्रता कमी होते. यामुळे त्वचेच्या बाहेरच्या थरामध्ये पाणी कमी होऊन त्वचा कोरडी होते आणि फाटू लागते.
-
एसीचा जास्त वापर केल्याने अॅलर्जी आणि दम्याची समस्या उद्भवू शकते. तसेच डोळे आणि त्वचेवर खाज येऊ शकते.
-
बऱ्याचवेळ एसीमध्ये राहिल्याने त्वचा आकुंचन पावते आणि सुरकुत्या, फाईन लाईन्स, वृद्धत्वयाच्या खुणा वाढू लागतात.
-
इतकंच नाही तर एसीची थंड हवा शरीरात डिहायड्रेशन समस्या वाढवू शकते.
-
लक्षात ठेवा, एसीचा वापर दुपारी आणि संध्याकाळी करू नये किंवा गरज भासल्यास अतिशय मर्यादित प्रमाणात करावा.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर