-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करत असतात. यामुळे काही राजयोग किंवा अशुभ योग निर्माण होतात.
-
ग्रहांच्या स्थितीचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. पंचांगानुसार १३ एप्रिलला सूर्याचे आपल्या उच्च प्रभावाच्या मेष राशीत गोचर झाले आहे.
-
तर २४ एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहेत. हे दोन्ही ग्रह एकत्र येताच यातून ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होणार आहे.
-
या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होऊन त्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
मेष राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोग बनल्याने मोठा फायदा होऊ शकतो. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक यश लाभण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.
-
शुक्रादित्य राजयोग बनल्याने कन्या राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन सुरु होऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. यावेळी तुम्ही कोणतेही वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.
-
शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना मोठे फायदे होऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. करिअर, व्यवसायात यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. राजकारण्यांना मोठी पदे मिळू शकतात. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ना मॉम, ना मम्मी…; परदेशात राहूनही जपले मराठी संस्कार! माधुरी दीक्षितची मुलं तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पाहा फोटो