-
ज्योतिषशास्त्रात बृहस्पतिला देवतांचा गुरू म्हटले गेले आहे. त्याला सर्वोत्तम दृष्टी असलेला ग्रह मानण्यात आला आहे.
-
सुमारे वर्षभर गुरू एकाच राशीत, म्हणजे स्वत:च्या मेष राशीत विराजमान आहे. १ मे २०२४ रोजी दुपारी १२:५९ वाजता गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
-
यानंतर ३ मे २०२४ रोजी वृषभ राशीतच गुरुचा अस्त होईल. गुरुच्या या चालीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसणार आहे.
-
गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं, त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
-
मेष राशीच्या लोकांसाठी बृहस्पति ग्रहाची स्थिती खूप शुभ ठरु शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात ज्यातून मोठा फायदा होऊ शकतो.
-
कर्क राशीच्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू शकते. एखाद्या कामात दीर्घकाळ अडथळे येत असतील तर ते दूर होऊ शकतात. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो.
-
तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल राहील. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…