-
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ३५ च्या पुढे गेला आहे. त्यामुळे उष्णतेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आरोग्याची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. (Photo: Freepik)
-
लठ्ठपणा दूर करून शरीराला एक परिपूर्ण आकार देणे असो किंवा आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवणे, योगासने हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे. (Photo: Freepik)
-
फक्त शारीरिक, मानसिक स्वास्थ्यच नाही, तर योग करून तुम्ही उन्हाळ्यातही स्वतःला थंड ठेवू शकता.(Photo: Freepik)
-
शीतली प्राणायाम आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी केला जातो. या प्रकारात तोंडावाटे हवा आत घेऊन नाकावाटे सोडली जात असल्याने शरीराला थंडावा मिळतो.(Photo: Freepik)
-
हे एक प्रकारचे श्वास घेण्याचे तंत्र आहे; जे आपले शरीर आतून थंड करण्यासाठी विशेषत्वाने उपयुक्त ठरते. हे आसन आपल्याला शरीर थंड राखण्यास मदत करते.(Photo: Freepik)
-
काक म्हणजे कावळा. या आसनामध्ये कावळ्याच्या चोचीसारखी मुद्रा बनवतात म्हणून याला ‘काकी मुद्रा’, असे म्हणतात.(Photo: Freepik)
-
शवासन हे आसन अन्य आसने केल्यानंतर शरीर आणि मनाला आराम मिळावा यासाठी अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता, शवासारखे पडून राहतो म्हणूनच त्यास शवासन म्हणतात.(Photo: Freepik)
-
या आसनामुळे शारीरिक, मानसिक थकवा, ताण कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, निद्रानाश यांवरही हे उपुयक्त आहे. (Photo: Freepik)
-
अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ही योगासने करा आणि निरोगी व आनंदी राहा.(Photo: Freepik)

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’