-
नऊ ते दहा तास लॅपटॉप, संगणकावर काम करणे, सतत मोबाईल स्क्रोल करीत बसणे आदी कारणांमुळे अनेकदा मान किंवा पाठ दुखते. त्यामुळे अनेकदा पाठीवर व मानेवर ताण पडतो. त्यामुळे नेहमी काम करताना सरळ बसावं असा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना आपल्यातील अनेक जण बेडवर पडून किंवा झोपून काम करण्याची व तासन् तास मोबाईल स्क्रोल करत असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
इन्स्टाग्रामवरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये कंटेंट क्रिएटर शिवम अहलावत यांनी तुमच्या बसण्याच्या पद्धतीनुसार तुमच्या मानेवर कसा भार पडतो हे स्पष्ट केले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर याचसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मॅक्स हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर, ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट डॉक्टर अखिलेश यादव आणि वैशाली यांनी मानेच्या वेगवेगळ्या कोनातून कशा प्रकारे तुम्हाला वेदना होऊ शकतात ते स्पष्ट केले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
डॉटरांच्या म्हणण्यानुसार- पुढील पोझिशन्समध्ये असताना फोनकडे किंवा इतर गॅजेट्सकडे जास्त वेळ पाहू नका… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर नेहमी सरळ बसून काम का करावे याचे कारण पुढीलप्रमाणे : तुम्ही सरळ किंवा ० डिग्रीमध्ये बसता तेव्हा मानेवर पाच किलो वजन येते. जेव्हा तुम्ही १५ डिग्रीमध्ये बसता तेव्हा मानेवर १२ किलोचे वजन येते.तुम्ही ३० डिग्रीमध्ये बसलेले असताना मानेवर १८ किलो, तर ४५ डिग्रीमध्ये मानेवर २२ किलो वजन येते.आणि ६० डिग्रीमध्ये – मानेवर २७ किलो वजन येऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमचा फोन किंवा इतर गॅजेट्स वापरत असताना तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे अँगल वापरत असाल, तर वेळीच टाळा. कारण- त्यामुळे तुमच्या मानेत वेदना होऊ शकतात आणि याचे गंभीर परिणाम तुम्हाला सहन करावे लागू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर या समस्येवर उपाय म्हणून डॉक्टरांनी मान ताठ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मान जेव्हा ताठ स्थितीत असते. तेव्हा डोक्याचे वजन सर्व्हिकल व्हर्टेब्रे (cervical vertebrae), इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि आधार देणाऱ्या स्नायूच्या बाजूने समान रीतीने विखुरलेले असते आणि तेव्हा मानेवर ताण कमी येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, जेव्हा आपण दीर्घकाळ चुकीच्या आसन पद्धतीत मोबाईल स्क्रोल करतो तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती डोक्याचे वजन वाढवते आणि मग आपण मान वाकवतो; ज्यामुळे मानेच्या संरचनेवर दबाव वाढतो. या वाढलेल्या ताणामुळे स्नायू, लिगामेंट व डिस्कवर ताण पडतो; ज्यामुळे अस्वस्थता आणि कालांतराने स्ट्रक्चरल डॅमेजदेखील होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल