-
नवजात बालकांचे पोषण आणि त्यांची वाढ आईच्या दुधावर होत असते. मात्र, काही महिन्यांनी त्यांना वेगवेगळे पदार्थ भरवण्यास सुरुवात केली जाते.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सहा ते सात महिन्यानंतर बालकांना पदार्थ भरवले जाऊ शकतात. अशावेळेस मुलांच्या आहाराबाबत काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे.
-
सुरुवातीला, लहान मुलांना पातळ पाणी, डाळीचे पाणी, ओट्स आणि पोहे इत्यादीसारखे पदार्थ दिले जाऊ शकतात. या गोष्टी पचायला सोप्या असतात, त्यामुळे मुलांची पचनक्रिया मजबूत होते.
-
नवजात बाळांना मांसाहारी पदार्थ कधी खायला द्यावेत हा प्रश्न अनेकदा मातांच्या मनात उद्भवतो. आज आपण जाणून घेऊया की नवजात बाळांच्या आहारात मांसाहारी पदार्थांचा समावेश केव्हा आणि कसा करावा.
-
सात ते आठ महिन्यांनंतर नवजात बालकांना चिकन किंवा मांस अन्न म्हणून दिले जाऊ शकते. जेव्हा बाळाला दुधाव्यतिरिक्त इतर अन्न देणे सुरू केल्यास त्यांच्या आहारात मांसाहारी पदार्थांचा समावेश केला जाऊ शकतो.
-
लहान मुलांना चिकन सूप देता येईल. अंडी आणि मासे यांसारख्या गोष्टींचाही मुलांच्या आहारात समावेश करू शकतो.
-
या बालकांना एका दिवसात फक्त दोन चमचे चिकन प्युरी खायला दिली जाऊ शकते. मुलाच्या वयानुसार चिकन किंवा इतर कोणत्याही मांसाहाराचे प्रमाण वाढवले जाऊ शकते.
-
चिकनमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे आणि मँगनीज अशी विविध प्रकारची खनिजे त्यात आढळतात.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या बाळांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी त्यांना झिंक आणि लोहाची सर्वाधिक गरज असते. आईच्या दुधात लोहाचे प्रमाण पर्याप्त नसते, त्याला पूरक म्हणून मांस किंवा चिकनचे सेवन केले जाऊ शकते.
-
जर बाळांना भाज्या आणि लापशीसोबत मांस प्युरी दिली तर त्यांना एनिमियासारखे आजार होत नाहीत.
-
७ महिन्यांनंतर बाळांना चिकन किंवा कोणतेही मांसाहार द्यायचे असल्यास ते पूर्णपणे शिजवून प्युरीच्या स्वरूपात द्यावे. या मुलांसाठी नेहमी हाडे नसलेले चिकन वापरावे.
-
लहान बालकांसाठी चिकन शिजवताना जास्त मसाले, कांदा, लसूण वापरला जाणार नाही याची काळजी घ्यावे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार