-
जेवण करणं अनेकदा सोपं असतं. पण, त्याचं नियोजन करणं अधिक कठीण असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळेच अनेकदा जेवण बनवताना अंदाज चुकतो व अन्न वाया सुद्धा जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
यामुळे जेवण बनवताना तयारी करण्यात खूप वेळ जातो आणि मग जेवण करणं कंटाळवाणं वाटू लागतं. म्हणूनच जेवणाचं नियोजन कसं करता येईल? अन्न वाया जाणार नाही यासाठी योजना आखणे गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही स्वयंपाकघरातील अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी पुढील काही उपाय करून पाहा… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एक यादी तयार करा – किराणा सामान खरेदी करायला जाण्यापूर्वी तुमच्या फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू आहेत याची एक यादी बनवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेवणाचे नियोजन करा – शक्य असल्यास सर्वप्रथम आठवडाभर रोज कुठल्या भाज्या करायचं ठरवून टाकावं आणि त्याप्रमाणे खरेदी करून घ्यावी. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अन्न कचराकुंडीत फेकून देऊ नका – जर तुम्हाला वाटत असेल की, रात्रीचा उरलेला भात तुम्ही नंतर खाऊ शकता तर फेकून न देता फ्रीजमध्ये ठेवा. जेणेकरून अन्न वाया जाणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
शक्य असल्यास तीन-चार दिवसांच्या भाज्या एकत्र आणून वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या साफ करुन फ्रीजमध्ये ठेवून द्याव्यात. म्हणजे त्या खराब होणार नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कंपोस्ट – उरलेलं अन्न आणि पालापाचोळा यांना कुजवून कंपोस्ट खत तयार करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या