-
जुन जुलै महिन्यात घरात डास खूप येतात. उन्हाळ्याचा शेवट असतो अन् पावसाळा सुरू होतो. डासांपासून वाचण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो. (Photo : pexels)
-
खरं तर डासांपासून रोगराई पसरते. अशात आरोग्य जपायचे असेल तर डासांपासून दूर राहणे गरजेचे आहे. (Photo : pexels)
-
डासांपासून वाचवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो पण काहीवेळा त्याचा काहीही फायदा होत नाही. सोशल मीडियावर डासांना पळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. (Photo : pexels)
-
फक्त एका कांद्याचा वापर करून तुम्ही डास पळवू शकता. तुम्हाला वाटेल ते कसं शक्य आहे? पण हे खरंय. एका कांद्याच्या मदतीने डास पळवता येतात. (Photo : pexels)
-
सुरुवातीला एक कांदा घ्या. त्यानंतर कांद्याची खालची बाजून थोडी कापून घ्या त्यानंतर एका छोट्या चमच्याने कांद्याच्या आतील भाग थोडा काढून घ्या (Photo : pexels)
-
त्यानंतर तीन कापूरच्या गोळ्या घ्या. त्यात दोन तीन लवंग घ्या. कापूरच्या गोळ्या आणि लवंग बारीक वाटून घ्या. (Photo : pexels)
-
त्यानंतर एका प्लेटमध्ये कांदा ठेवा. कांद्याचा आतील भाग काढल्यामुळे कांद्याला वाटीसारखा आकार येईल. (Photo : pexels)
-
त्यात थोडं तेल टाका आणि कापूर आणि लवंगचे बारीक केलेले मिश्रण त्यात टाका. त्यानंतर वात घ्या आणि दिवा लावा. (Photo : pexels)
-
संध्याकाळी हा दिवा लावल्याने घरातील डास गायब होतील. डासांपासून सुटका मिळवायची असेल तर घरगुती उपाय फायद्याचा ठरू शकतो. (Photo : pexels)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल