-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर काही ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. यापैकी एक ग्रह म्हणजे बुध.
-
बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. व्यवसाय, करिअर आणि बुद्धिमत्तेचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाचा येत्या ऑगस्ट मध्ये कर्क राशीमध्ये उदय होणार आहे.
-
या ग्रहस्थितीचा काही राशींच्या लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. काही राशीचे लोक या काळात भाग्यवान ठरु शकतात.
-
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
बुधदेवाच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची अपेक्षा आहे. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. बुधदेवाच्या उदयामुळे प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
-
बुधदेवाच्या उदयामुळे कर्क राशीच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता. या काळात, तुम्हाला एक नवीन डील मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात.
-
कन्या राशीच्या लोकांना बुधदेवाच्या उदयामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडू शकतात. करिअरमध्ये चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल