-
वाढत्या वयामुळे आपल्या त्वचेमध्ये अनेक बदल होत असतात. सुरकुत्या येणे ही सामान्य गोष्ट आहे; पण बऱ्याचदा अशा वृद्धत्वाची लक्षणे वेळेआधी दिसू लागतात. अशा वेळी महिला मेकअप करून या खुणा लपवण्याचा प्रयत्न करतात.(Photo: Freepik)
-
सामान्यतः बदललेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे तुम्ही अकाली वृद्ध दिसू लागता. चेहऱ्याच्या काही व्यायामाने सुरकुत्या येण्याच्या समस्येपासून बऱ्याच अंशी तुमची सुटका होऊ शकते. (Photo: Freepik)
-
चला तर मग अशा चेहऱ्याच्या व्यायामांबद्दल जाणून घेऊ; जे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. योगतज्ज्ञ कामिनी बोबडे यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.(Photo: Freepik)
-
फिश फेस योगा, या व्यायामाने सुरकुत्याची समस्या दूर केली जाऊ शकते. वास्तविक हा व्यायाम गालांच्या स्नायूंना टोन करतो आणि चेहऱ्याची त्वचा ताणण्यासही मदत करतो. (Photo: Freepik)
-
त्याशिवाय हा व्यायाम रोज केल्यास रक्ताभिसरणही सुरळीत होते आणि त्यामुळे त्वचेवर चमकही येते. फिश फेस एक्सरसाइज करण्यासाठी तुमचे गाल व ओठ आतल्या बाजूला खेचा आणि पाच ते १० सेकंद या आसनात राहा. (Photo: Freepik)
-
तोंड बंद करा आणि माशाच्या चेहऱ्याप्रमाणे गाल आतल्या बाजूला खेचून घ्या. या पोजमध्ये राहून हसण्याचा प्रयत्न करा. १५ ते २० सेकंद या पोजमध्येच राहा. (Photo: Freepik)
-
तुम्हाला गाल आणि जबड्याच्या भागात तणाव जाणवेल.आता पोज सोडा आणि आराम करा. ही एक्सरसाइज नियमितपणे किमान पाच वेळा करा.(Photo: Freepik)
-
शीर्षासन हे अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. (Photo: Freepik)
-
या आसनामुळे मेंदूपर्यंत अधिक रक्तपुरवठा होतो. मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.(Photo: Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल