-
५ ऑगस्ट २०२४ पासून म्हणजे सोमवारपासून श्रावणाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी शिव भक्त महादेवाची विशेष साधना करतात, काही जण उपवास सुद्धा ठेवतात. (फोटो सौजन्य: @freepik)
-
तर उपवासाला खिचडीशिवायही साबूदाण्यापासून विविध पदार्थ तयार केले जात असतात. त्यात प्रामुख्याने साबुदाणा वडे, साबुदाणा खीर यांचा समावेश असतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
तर आज आपण ‘साबुदाण्याची पेज’ कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर आपण साबुदाण्याची पेज कशी बनवायची हे पाहूया. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
साबुदाण्याची पेज बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी साबुदाणे, एक वाटी साखर, पाणी आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @freepik)
-
एक वाटी साबुदाणे अर्धी वाटी पाण्यात पाच मिनिटे भिजवून घ्या.नंतर गॅसवर एक टोप ठेवा त्यात दोन ग्लास पाणी टाका आणि उकळवून घ्या.(फोटो सौजन्य: @freepik)
-
पाणी उकळल्यानंतर भिजत घातलेले साबुदाणे त्यात टाका आणि हलवत रहा.(फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
-
साबुदाणे शिजल्यावर त्यात एक वाटी साखर घाला. साखर व्यवस्थित विरघळू द्या.अशाप्रकारे तुमची साबुदाण्याची पेज तयार. (फोटो सौजन्य: @chamchamit / युट्युब)
-
तुम्ही ही पेज तीन पद्धतीने बनवू शकता. वर दिलेल्या स्टेप्सप्रमाणे पाण्याच्या जागी तुम्ही दूध घालून सुद्धा पेज तयार करू शकता. तर तिसरी पद्धत म्हणजे सुरवातीला शाबूदाणे भाजून घेऊन सुद्धा पेज करू शकता. या तिन्ही पद्धतीने पेज बनवल्यावर प्रत्येकाची चव तुम्हाला नक्कीच वेगळी वाटेल. (फोटो सौजन्य: @freepik)
-
(टीप – पेज तयार करण्याआधी जर साबुदाणे पाण्यात भिजत घातले तर साबुदाणे शिजण्यास जास्त वेळ लागत नाही. ) (फोटो सौजन्य: @freepik)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली