-
तुम्ही केसांच्या मजबूतीसाठी रोझमेरी विविध प्रकारे वापरू शकता. ही एक औषधी वनस्पती केसांच्या अनेक समस्या कमी करण्यास मदत करू शकते. हे औषधी वनस्पती बॅक्टेरियाविरोधी तसेच दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जाणून घेऊया रोजमेरीच्या सोप्या घरगुती पद्धती.
-
वाळलेल्या रोझमेरीच्या पानांना नारळाच्या तेलासोबत एकत्र करा, काही वेळानंतर हे मिश्रण गाळून घ्या. केसांच्या मजबूतीसाठी तुम्ही हे तेल वापरू शकता.
-
तुम्ही घरी रोझमेरी तेलाचा हेअर मास्क देखील बनवू शकता. यासाठी नारळाच्या तेलामध्ये रोझमेरी तेल मिसळा आणि केसांना लावा. तुम्ही केस धुण्यापूर्वी ३० मिनिटापर्यंत हे लावू ठेवू शकता. हे केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत करते.
-
तुम्ही केस धुण्यापूर्वी रोझमेरी तेलाचे काही थेंब शैम्पूमध्ये घालून वापरल्याने डोक्यातील कोंडा कमी होतो आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत होते.
-
रोझमेरी तेल पाण्यात मिसळून ते पाणी केसांवर स्प्रे केल्याने केस घळती कमी होते आणि केस वाढण्यास मदत होते.
-
रोझमेरीचे काही पानं पाण्यात भिजवून ठेवा आणि केस धुतल्यानंतर तुम्ही ते पाणी केसांवर वापरू शकता, हे केसांना नैसर्गिक चमक देऊन कोंडा कमी करण्यासाठी मदत करते.
-
रोझमेरी केसांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. केस मजबूत वाढवण्यासाठी तुम्ही घरी या सोप्या पद्धती करू शकता.

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..