-
बीट खाण्याचा अनेक जण कंटाळा करतात. जर तुमच्याही घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बीट खाण्याचा कंटाळा करत असतील. तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्याचे नाव आहे ‘बीटाचा पराठा’. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बीटाचा पराठा बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो बीट, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, धने-जिरे पावडर, तेल (तूप किंवा बटर आवडीनुसार), मीठ, गव्हाचे पीठ इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik
-
पाव किलो बीट धुवून घ्यायचे. बीटाची साल काढून त्याला कुकरमध्ये उकडवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मिक्सरच्या भांड्यात हे उकडलेलं बीट घाला आणि त्यात हळद, मीठ, मसाला आणि गरम मसाला, धने-जिरे पावडर घाला. हे सर्व मिस्करमध्ये बारीक करून घ्या आणि पाणी अजिबात घालू नका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर सर्वप्रथम परातमध्ये गव्हाचे पीठ घ्या त्यात तेल घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण पिठात एकजीव करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाच मिनिटे असंच ठेवा व नंतर या पिठाचे गोळे करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यानंतर पोळी लाटतात त्याप्रमाणे लाटून घ्या आणि तव्यावर तूप, बटर किंवा तेल या पैकी कोणताही एक पदार्थ वापरून पराठे शेकून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही बीट पराठा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर अशाप्रकारे ‘बीट पराठा’ तयार.(फोटो सौजन्य: @Freepik / युट्युब/ @TabuTinkuFoodies)

Nepal Gen Z Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं! नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलकांचा हिंसाचार