-
तासनतास बसून राहिल्यामुळे किंवा झोपण्याच्या चुकीच्या शैलीमुळेही पाठदुखी होऊ शकते.
-
याकडे दुर्लक्ष केल्याने हा त्रास वाढू शकतो यासाठी येथे काही सोपे उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.
-
तुम्ही तुमच्या शरीराला जितकं जास्त सक्रिय ठेवाल तितके तुम्ही या समस्येपासून मुक्त राहू शकता.
-
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कोल्ड थेरपी घेऊ शकता. यासाठी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता किंवा होत वॉटर बॅग दुखणाऱ्या भागावर लावू शकता. तुम्ही यासाठी बर्फ देखील वापरू शकता.
-
पाठदुखीवर मसाजही प्रभावी असतो. पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी अनेक मसाज तंत्रे आहेत. यामध्ये ट्रिगर पॉइंटवर दाब मिळावल्यावर स्नायू शिथिल होतात.
-
जर पाठदुखी गंभीर असेल तर तुम्ही ॲक्युपंक्चरचीही मदत घेऊ शकता. ही एक पारंपारिक वैद्यकीय पद्धत आहे ज्यामध्ये वेदना कमी करण्यासाठी लहान सुया वापरल्या जातात.
-
व्यायाम आणि स्ट्रेच केल्यानेही पाठदुखीपासून आराम मिळू शकतो.
-
योगामुळे पाठदुखीपासून आराम मिळू शकतो. कोब्रा पोजमुळे पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. हे नियमितपणे केल्यास शरीराला अनेक फायदे देखील होतात.
-
आधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो: फ्रीपीक)
डिस्चार्ज मिळाल्यावर धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? हेमा मालिनी म्हणाल्या, “सगळं काही देवाच्या हातात…”