-
भिजवलेले काळे मनुके आणि चिया सीड्सचे मिश्रण हे एक लोकप्रिय आरोग्यदायी पेय आहे, त्याच्या प्रभावी पौष्टिक गुणांमुळे त्याचे कौतुक केले जाते. या पेयाचे आरोद्यायी फायदेही आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक यांनी सांगितले की, काळे मनुका आणि चिया सीड्समधील समन्वय पौष्टिक शक्ती निर्माण करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सूर्यप्रकाशात वाळवलेले हे काळे मनुके अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे मुक्त रॅडिकल्सचा सामना करण्यास आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करतात. ते आयर्नचा एक चांगले स्त्रोतदेखील आहेत, जे अशक्तपणा टाळण्यासाठी आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आवश्यक आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
चिया सीड्स हे लहान पॉवर हाऊस ओमेगा-३ फॅटी अॅसिडने युक्त आहे आणि ते हृदय निरोगी ठेवण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत. चिया सीड्स फायबर, प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोतदेखील आहे, ज्यामुळे स्नायू तयार करणे आणि हाडांची ताकद वाढवण्यास मदत करते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
मल्होत्रा म्हणाले की, काळे मनुके आणि चिया सीड्स एकत्र केल्यावर अनेक प्रकारचे आरोग्य फायदे मिळतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
पचनक्रिया सुधारते- दोन्ही घटकांमधील फायबर सामग्री नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना प्रोत्साहन देते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हृदय सुदृढ राहते- चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, काळ्या मनुक्यांमधील अँटिऑक्सिडंट्ससह जळजळ कमी करून आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करून हृदयाच्या आरोग्यासाठी प्रोत्साहन देतात.(फोटो सौजन्य: Freepik)
-
या पौष्टिक पेयाचा लाभ घेण्यासाठी मूठभर काळे मनुके रात्रभर भिजत ठेवा. सकाळी चिया सीड्स पाण्यासह मिसळा किंवा फक्त पाण्यात घाला आणि चिया सीड्सचे एक जेल बनवा. हे पेय आपल्या दैनंदिन दिनचर्येत १-२ वेळा समाविष्ट करा, यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु, या गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, काळ्या मनुका आणि चिया सीड्सचे पाणी अनेक फायदे देतात; परंतु यांना संतुलित आहाराच्या जागी घेऊ नये. (फोटो सौजन्य: Freepik)

Guru Purnima Horoscope: स्वामींच्या कृपेने प्रयत्नांना मिळेल साथ; हातून घडेल चांगले काम; वाचा गुरुवार विशेष तुमचे राशिभविष्य