-
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. नवग्रहांमध्ये शुक्र ग्रहाला धन, वैभव, आकर्षण, प्रेम आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या राशी परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह १८ सप्टेंबर रोजी त्याची मूळ त्रिकोण राशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीत शुक्र सातव्या घरात राहणार असून याचा प्रभाव मेष राशीसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल. बँक बँलन्स वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्र वृषभ राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र चांगले फळ देणारा ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीमध्ये शुक्र अकराव्या घराचा स्वामी असून चौथ्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. शिक्षणातील अडथळे दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“पण घाई काय आहे?”, सरन्यायाधीश गवई यांची टिप्पणी; मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील १२ आरोपींच्या सुटकेला महाराष्ट्र सरकारचे आव्हान