-
दुधाचे सेवन केल्याने अनेक समस्या दूर होतात, पण जर तुम्ही दुधात ड्रायफ्रूट मिसळून प्यायले तर त्याचे फायदे आणखी वाढतात. जाणून घेऊया या विशेष ड्रायफ्रूटबाबत.
-
खजूरमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. पण ते सेवन करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. खरं तर, खजूर रात्रभर दुधात भिजवावे लागतात आणि नंतर ते सकाळी रिकाम्या पोटी प्यावे याचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या दुर होतात. -
कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम समृद्ध खजूर दुधात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते. सांधेदुखीवरही हे फायदेशीर ठरू शकते.
-
खजूरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. दुधात खजूर मिसळून रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲनिमियासारख्या समस्यांपासून आराम मिळतो आणि शरीराला ऊर्जाही मिळते.
-
खजूर आणि दुधाचे मिश्रणही पचनासाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते जे पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करते.
-
खजूरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ते दुधात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
-
दुधात भिजवलेल्या खजूरांचे सेवन रक्तदाबाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व आढळतात जे हृदयासाठी फायदेशीर असतात.
-
काही लोकांना लठ्ठपणाचा त्रास असतो त्यांच्यासाठी खजूर आणि दुधाचे सेवन रामबाण उपाय ठरू शकतो. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहतं त्यामुळे काहीही खाणं टाळता येतं. तसेच रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने चयापचय क्रिया व्यवस्थित राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
-
व्हिटॅमिन डी आणि सी समृद्ध खजूर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहेत. दुधात मिसळून सेवन केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि केस मजबूत होतात. (फोटो: फ्रीपिक)
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट