-
नवरात्रोत्सव सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक जण उपवास करतात. काही लोक उपवासाला फळांशिवाय काहीही खात नाहीत; पण काही लोकांना उपवास करताना स्वादिष्ट पदार्थ खाण्याची आवड असते. (Photo : Freepik)
-
उपवासादरम्यान आपण तांदूळ, गहू, कडधान्ये खात नाही. पण, यातून मिळणाऱ्या पोषक घटकांची कमतरता सुका मेवा भरून काढू शकतो. त्यात असलेले प्रोटिन्स, फायबर आणि फॅट्स उत्तम ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यामुळे उपवासादरम्यान तुम्ही सुका मेवा भरपूर खाऊ शकता. नवरात्रीच्या उपवासासाठी सुका मेवा हा खूप चांगला पर्याय आहे. (Photo : Freepik)
-
सुका मेवा हा जास्त काळ टिकणाऱ्या फळांचा प्रकार आहे. त्यात द्राक्षे, सफरचंद, खजूर, अंजीर, मनुका इत्यादींचा समावेश असतो. (Photo : Freepik)
-
नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल फाउंडेशन सेंटरच्या डॉ. सीमा गुलाटी सांगतात, “सुका मेवा हा जेवणासाठी एक चांगला पर्याय आहे. त्यात असलेल्या साखरेमुळे आपल्या शरीराला प्रोटिन्स मिळतात. बटाट्याचे तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा सुका मेवा खाणे नेहमी चांगले. शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढू नये म्हणून सुका मेवा दूध आणि दह्यामध्ये मिसळून खाऊ शकता.” (Photo : Freepik)
-
सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स कॅरोटिनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात. सूर्यप्रकाशात वाळवलेली द्राक्षे म्हणजेच मनुक्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. (Photo : Freepik)
-
डॉ. गुलाटी सांगतात, “नियमित थोड्या प्रमाणात मूठभर सुक्या मेव्याचे सेवन केल्याने तुम्हाला चार ते पाच तासांसाठी ऊर्जा मिळू शकते. सुक्या मेव्यामध्ये पोटॅशियमसारखे पोषक घटक आहेत. मनुका शरीरात GLP -1 नावाचे हार्मोन्स वाढवतात; जे स्वादुपिंडावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे ठरावीक प्रमाणात मनुका खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.” (Photo : Freepik)
-
गुलाटी पुढे सांगतात, “प्रोटिनयुक्त आणि फॅट्सयुक्त बदाम खावेत. मूठभर बदाम खाल्ल्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळू शकते. मर्यादित प्रमाणात खजूर खाल्यामुळे रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉलची पातळी अनियंत्रित होत नाही आणि वजनसुद्धा वाढत नाही. (Photo : Freepik)
-
बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट वाणी कृष्णा यांनी भोपळा आणि टरबूजबरोबर सुका मेवा एकत्रित खाण्याचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात, “तुम्ही आहारात २५ ग्रॅम सुका मेवा घेऊ शकता. नवरात्रीत उपवासामुळे शरीराला ग्लुटेन मिळत नाही; पण साबुदाणा खिचडीबरोबर तुम्ही सुका मेवा खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळेल.” (Photo : Freepik)
-
सुका मेवा नियमितपणे खाऊ शकतो का?
मर्यादित प्रमाणात सुका मेवा खाल्याने रक्तातील साखरेची पातळी किंवा वजन वाढत नाही. सुक्या मेव्याबरोबर चांगली झोप आणि नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. भरपूर पाणी प्या. (Photo : Freepik)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल