-
डाएट सुरू असताना समोर एखादा चटपटीत किंवा गोड पदार्थ दिसला की, आपल्यातील कोणालाच राहवत नाही. मग केव्हा केव्हा तर आपण डाएटिंग सोडून थोडंसं का होईना गोड पदार्थ चाखून पाहतोच. (फोटो सौजन्य : @freepik)
-
पण, पुढच्या वेळी असा क्षण तुमच्यासमोर आल्यावर, फक्त एक पाऊल मागे घ्या आणि फक्त पाच मिनिटं शांत बसा. पण, आता तुम्ही विचार करीत असाल की, पाच मिनिटांनी असा काय फरक पडू शकतो? तर असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही आहात.(फोटो सौजन्य : @freepik)
-
फिटनेस ट्रेनर ऋषभ तेलंग यांनी अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले, “स्वतःला पाच मिनिटे द्या आणि विचार करा की, तुम्हाला अजूनही तो नाश्ता हवा आहे का? आणि जर तुमचं उत्तर हो असेल, तर तो नाश्ता नक्की खा. पण, तुम्ही १० पैकी आठ वेळा या साध्या हॅकच्या मदतीनं तुमच्या सवयीला आळा घालू शकता. (फोटो सौजन्य : @freepik)
-
तर या हॅकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्राच्या आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी यांच्याशी संपर्क साधला. डाएटदरम्यान सारखं काहीतरी गोड, चटपटीत खाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर यावर उपाय शोधणं गरजेचं ठरतं. तर हा उपाय म्हणजे तुम्ही ‘फक्त पाच मिनिटं थांबा आणि दीर्घ श्वास घ्या’. (फोटो सौजन्य : @freepik)
-
हा उपाय व्हिज्युअलायजेशन करून तुमची चिंता कमी करून, तुमचं मन आवडतं चॉकलेट, आइस्क्रीम किंवा चिप्स खाण्याचा पुनर्विचार करण्यास मदत करू शकतं, असं आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य : @freepik)
-
ती पाच मिनिटं तुमचा मेंदू रिसेट करून तुम्हाला जंक फूड खाण्यापासून दूर ठेवतील आणि तुमचं लक्ष अधिक रचनात्मक विचारांकडे वळवतील. तुम्ही स्वतः च विचार करा की, या गोष्टी खाण्याची तुम्हाला खरंच गरज आहे का? अशा वेळी तुम्हाला जंक फूड सेवन का करावंसं वाटत आहे? याचं कारण समजण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य : @freepik)
-
आहारतज्ज्ञ फौसिया अन्सारी म्हणाल्या आहेत. पाच मिनिटांचा हा हॅक तुम्हाला दीर्घकाळासाठी क्रेव्हिंगवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. जेव्हा तुम्हाला क्रेव्हिंग वाटेल तेव्हा थांबा, तुम्हाला त्याची गरज आहे का हे स्वतःला विचारा. तुमच्या ध्येयाची स्वतःला आठवण करून द्या. (फोटो सौजन्य : @freepik)
-
आपल्यातील बहुतांश जण कितीही उपाय केले तरीही अशा क्रेव्हिंगला शेवटी बळी पडतात. पण, ही एक मानवी कृती आहे; जी स्वाभाविक आहे. खूप दिवसांचे अंतर ठेवून तुम्ही एखादा गोड किंवा चटपटीत पदार्थ खाऊ शकता; पण दररोज नाही. कारण- या क्रेव्हिंगमुळे तुमचं वजन व तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. (फोटो सौजन्य : @freepik)
-
अशातच तुम्हाला आणखीन सोपा उपाय हवा असेल, तर तुम्ही फळं खाऊन किंवा फक्त पाणी पिऊन तुमची क्रेव्हिंग आरोग्यदायी पद्धतीनं पूर्ण करू शकता.(फोटो सौजन्य : @freepik)

पुढील २३ महिन्यांच्या काळात होणार नुसता धनलाभ; शनीदेवाचे गोचर ‘या’ तीन राशींना देणार करिअर,व्यवसायात यश