-
हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शारदीय नवरात्रीला सुरूवात होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
यंदा शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून ते ११ ऑक्टोबरपर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसारही नवरात्रीचा हा काळ खूप खास मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा काळ अनेकांच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येणारा असतो. तसेच सूर्य नवरात्रीनंतर १७ ऑक्टोबर रोजी शुक्राच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याचे हे तूळ राशीतील राशी परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींनाही सूर्याच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने कर्क राशीच्या व्यक्तींनाही सुख-समाधान प्राप्त होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)