-
भारतात उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पण, याच धार्मिक महत्त्वाशिवाय उपवासाचे वैज्ञानिक फायदेदेखील आहेत. सध्या नवरात्र सुरू असून या दिवसात अनेक जण नवरात्रीचे उपवास करतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
उपवास करण्याचे वैज्ञानिक फायदेदेखील आहेत. परंतु, जे उपवास करीत नाहीत असे लोक उपवास करण्याच्या फायद्यांना कमी समजतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्ही उपवासाचे तासानुसार शरीरावर होणारे परिणाम विभाजित केले, तर ही विचारसरणी बदलू शकते. त्यासाठी आम्ही डॉ. मनेंद्र, सल्लागार व एचओडी, क्रिटिकल केअर विभाग, ग्लेनिगल्स हॉस्पिटल्स, लकडी का पुल, हैदराबाद यांच्याशी संपर्क साधला. (फोटो सौजन्य: Freepik)
-
डॉ. मनेंद्र म्हणाले, “जेव्हा तुम्ही उपवास करता, तेव्हा कालांतराने अनेक शारीरिक बदल होतात. कारण- तुमचे शरीर अन्नाच्या अभावाशी जुळवून घेत असते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
०-४ तास उपवास = जेवल्यानंतर लगेच आपले शरीर पचनावर लक्ष केंद्रित करते आणि पोषक द्रव्ये शोषून घेते. डॉ. मनेंद्र यांनी सांगितले, “रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढते; ज्यामुळे ऊर्जा मिळते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
४-८ तास उपवास = पचन पूर्ण झाल्यानंतर रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी होते. डॉ. मनेंद्र यांनी सांगितले, “शरीर ऊर्जेसाठी यकृत आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन (संचयित ग्लुकोज) वापरते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
८-१२ तास उपवास = ग्लायकोजेनचा साठा कमी झाला की, शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरते. डॉ. मनेंद्र यांच्या मते, “याला केटोसिस म्हणतात; जेथे फॅटी अॅसिडचे केटोन्समध्ये रूपांतर होते आणि त्याद्वारे मेंदू व स्नायूंना इंधन मिळते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
१२-१६ तास उपवास = शरीर चरबी कमी करण्यास सुरुवात करते आणि केटोन्सची पातळी वाढवते. डॉ. मनेंद्र यांनी सांगितले, केटोन्सची वाढलेली पातळी हार्मोन्सचे उत्पादन वाढवू शकते आणि त्यामुळे चांगली चरबी व स्नायू यांचे संरक्षण होण्यास मदत होते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
१६-२४ तास उपवास = जेव्हा पेशी खराब झालेले घटक तोडून आणि त्यांचा पुनर्वापर करून स्वतःची दुरुस्ती करू लागतात तेव्हा ऑटोफॅजी सुरू होते. डॉ. मनेंद्र यांनी स्पष्ट केले, “जळजळ कमी होते आणि शरीर सेल्युलर देखभालीवर लक्ष केंद्रित करते.” (फोटो सौजन्य: Freepik)
-
२४ तासांहून अधिक उपवास केल्याने केटोसिस खोल होतो आणि ऑटोफॅजी वाढते. डॉ. मनेंद्र यांनी सांगितले, “यामुळे इन्सुलिन पातळीत लक्षणीय घट होण्यासह नुकसानकारी चरबी कमी होण्यास प्रोत्साहन मिळते आणि रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याची शरीराची क्षमता वाढवते.” (फोटो सौजन्य: Freepik)

Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण…